History Vignettes

महाराजा संभाजी राजे यांचे एक न ऐकलेले संस्कृत भाषेच्या पत्रात असे लिहिलेले की आपण बादशहा औरंगजेेब याला पकडून कैद करूया

Sandeep Balakrishna, Translator: प्रफुल्ल

Read this article in English

ऐतिहासिक दृष्ट्या हे नक्कीच आहे की औरंगजेेब याला संपूर्ण भारतात हिंदूच नव्हे तर मुस्लिम नवाब आणि सरदार सुद्धा समान पणे घृणा आणि निंदा करत होते जरी कितीही बुद्धीच्या चातुर्याने किंवा आडवाटेने विपर्यास करून त्याच्या निघृण कर्तुत्वावर चांगलेपणाची चादर ओढली तरी . औरंगजेेब शैतान होता आणि त्याचा शैतानीपणाला त्याच्या धर्माच्या सिद्धांताने मान्यता दिली आहे ज्याचा तो एक क्रूर धर्मांध उपासक होता. हे सांगणे गरजेचे नाही की त्यांनी त्याचा वेळ स्वतःच्या राज्यात झालेली बरीच बंड आणि उठाव शांत करण्यासाठी खर्च केला जे त्याच्या सर्व साम्राज्यात रानटी गवतासारखे वाढत होते.

हिंदूंच्या दृष्टिकोनातून ही कथा पाहिली पाहिजे . औरंगजेबाचा सर्वात कट्टर आणि त्याला धाकेत ठेवणारा शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले नव्हते पण त्यांनी सुरुवातीपासून एक प्रबळ आणि चिरस्थायी साम्राज्य उभे केले जेणेकरून एका भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली युगाचे आरंभ केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी राजे किंवा शंभुजी राजे यांनी धीटपणे , दृढनिश्चयाने व न जुमानता क्रोध दाखवून त्यांच्या वडिलांचे स्वातंत्र्याची धगधगती मशाल पुढे नेली. परंतु वाईची दुर्देवी लढाई, नंतरचा रक्तपात यांचा परिणाम वेगळा असतात तर न जाणो, औरंगझेेबच्या रक्तरंजित इस्लामी रानटीपणा पासून आधीच मुक्त झालो असतो.

पुढे संभाजी महाराजांवर भीषण अत्याचार करून त्यांचा मृत्यू झाला हे सर्वश्रुत आहे.परंतू त्यांच्या मृत्यूच्या सात वर्षाच्या आधी त्यांनी दोन संस्कृतमध्ये पत्र लिहिली होती जी लोकांना फारशी माहिती नव्हती. दोन्ही पत्रांचा मजकूर जवळजवळ एक सारखाच आहे परंतु त्यांच्यातत्यांनी औरंगजेेब विरुद्ध लढण्याची एक दमदार खंबीरपणा दाखवलेला आहे.

महत्त्व

ती दोन पत्रे महत्वाचे आहे ह्या कारणाने की संभाजी महाराजांनी पहिल्यांदा औरंगजेबाची सत्ता उलथून टाकण्याचा आपला हेतू नोंदवला त्याच्याशी युद्ध करण्या ऐवजी. हे दर्शवते की संभाजी महाराजांचे प्राचीन सनातन धर्म आणि त्याच्या कोटयावधी अनुयायांवर अविचलत निष्ठा व नितांत प्रेम होते. या पत्रात त्यांनी असे चित्रांकित केले की औरंगजेबाला सगळेजण का घृणा करतात आणि कसे त्याने सनातन धर्मा विरुद्ध संहार करून त्याचे नामोनिशान मिटविण्याचा प्रयत्न केला या सनातन धर्माच्या जन्मभूमित.

दुसरे हे उल्लेखनीय सत्य आहे की संभाजी महाराजांनी रामसिंगला हे पत्र लिहिले जो औरंगजेबाचा एक विश्वासु मांडलिक होता. संभाजी महाराजांना हे ठाऊक होते की त्याने हे स्वतः लिहिलेले पत्र हे मोठे धोक्याचे आहे आहे तरीही त्यांनी सनातन धर्माच्या सेवेसाठी पत्र लिहिले. मराठ्यांच्या झेंड्याखाली घडलेला हा इतिहास आहे सनातन धर्माला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि हा थरारक भाग सांगायला पाहिजे, परत परत एकसारखे सांगायला पाहिजे प्रौढांना आणि मुलामुलींना.

ही संस्कृतची पत्रे जयपूर राज्याच्या कागदपत्र संग्रहात मिळाले होते १९४० च्या आसपास. मुघल साम्राज्याच्या अधोगतीच्या शेवटच्या काही वर्षात झालेल्या पत्रव्यवहाराच्या मोठ्या संग्रहा मध्ये सापडले होते ही पत्रे एक भाग म्हणून .जास्त करून पत्र व्यवहाराचा भाग हिंदी मध्ये होता आणि त्याच्यात मुघल दरबारात व त्यांचे राजपूत मांडलिक होते त्यामध्ये जास्त करून जयपूरमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनांचा बारकाईने उल्लेख होता. त्या संग्रहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या १६६६ साली आग्‍ऱ्याचा दौरा पण चित्रीत केले आहे.

तो संदर्भ

संभाजी महाराजांनी राम सिंग यांची निवड केली यात मुत्सद्दीपणा, धर्म आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृप्रेमाच्या निमित्ताने.

रामसिंग यांचा मुलगा कृष्ण सिंग किंवा किशन सिंग याचीऔरंगझेेबने नेमणूक केली होती दूर महाराष्ट्रात एक सैन्यदलप्रमुख म्हणून, औरंगझेेबच्या भाषेत धर्मनिंदक मराठांवर करडी नजर ठेवण्यासाठी.पण औरंगझेेबचा स्वतःचा मुलगा मुहम्मद अकबर यांनी बंड पुकारलं होतं आपल्या वडिलांनी विरुद्ध वतिकडून पळून जाऊन संभाजी महाराजांच्या आश्रयाखाली आला. कृष्णा सिंगनी त्याला सहजपणे मदत केली पण ते प्राणघातक ठरले. नंतर औरंगजेबाने त्याला १० एप्रिल १६८२झाली ऐतिहासिक किल्ला परांडा, जो एका तासाच्या अंतरावर आहे सोलापूर पासून, येथे ठार केले. कृष्णा सिंग फक्त एकोणीस वर्षाचा मुलगा होता जेव्हा त्याचा शिरच्छेद करण्यात आले होते. पुढच्या वेळेला आपण जर परांडा किल्ल्याला भेट देत असाल तर कृष्णा सिंग याच्या बद्दल कृतज्ञतेचे अश्रू ढाळण्यात विसरू नका.

ते पत्र

संभाजी महाराज संस्कृत मध्ये बरेच शिकलेले होते आणि त्यांचे संस्कृतचे अत्यंत विश्वासू अभ्यासक निकटवर्ती मंत्री नामांकित कवी कलश हेहोते. कवी कलश पारंपरिक पंडित व पुरोहितहोते आणि त्यांनी संस्कृत साहित्यात निष्णात विपुलता आणि खोलवर शिक्षण घेतले होते. असे म्हणतात की संभाजी महाराजांनी जे पत्र लिहिले आहे त्यांनी ते त्यांनी ते स्वतः सांगितले आणि कवी कलशांनी ते लिहून काढले गेले. दुसरा मजकूर सांगतो की संभाजी महाराजांनीस्वतःच्या हातानी लिहिले होते. त्याची उचित प्रत टांकसाळानी बनवली होती.

विद्वान आणि इतिहासकार यांनी ह्या पत्रांची खूप स्तुती केली आहे. ह्याच्यात संस्कृत गद्याची सुस्पष्टता आणि अभिजातपणा दिसून येते . पत्र मूळ संस्कृतमध्ये किंवा भाषांतरात वाचण्यात चांगले आहे. त्यांच्या मनातील उत्कटता, धर्माची तीव्र भावना आणि कुशल मुत्सद्देगिरीस कोणतेही शब्द न्याय करू शकत नाही.

नोव्हेंबर १६८२ चे एक पत्र मी येथे दाखवतोय संस्कृत मध्ये लिहिलेले आणि त्यातले काही मुख्य उतारे मराठी मध्ये देत आहे.जोर जोडलेला आहे

संभाजी महाराजांचे मूळ संस्कृत मधले पत्र

संभाजी महाराजांचे पत्राचे भाषांतरित केलेले काही उतारे

संभाजी राजा कडून अंबरचे राजा रामसिंग यांना

श्री शंभूराजे आपल्या मैत्रीचे आस धरत आहे आणि आपली कल्याण पूर्वक विचारपूस केल्यानंतर स्वतःच्या शब्दानेतेमी आपल्याशी संपर्क साधत आहे.

आम्हाला आपले संप्रेषित पत्र प्राप्त झाले आणि आपला हेतू आम्हाला समजले आहे की आम्ही दिल्लीच्या बादशहाच्या विरोधात जाऊ नये.

त्याच्यानंतर आपणास कळले असेल की आपला मुलगा कृष्ण सिंगहा सुलतान अकबर बरोबर मैत्री करून उध्वस्त झाला. आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन पूर्ण विचार केल्यावर आम्हाला प्रशंसनीय शब्दातपरत लिहिले की आम्हीसुलतान अकबरला आमच्या साम्राज्यात आश्रयदिल्याबद्दल योग्य कृती केली. आणि आम्ही ज्या मार्गाने चाललो होतो त्याचावर तुम्ही मंजुरी सुद्धा द्यायलातयारी दर्शवली जिथे आपल्यालाफायदा असेल तर त्याची अंमलबजावणी करायला तयार झालात कारण आपण हिंदू आहोत म्हणून.

जर खरोखरच तुमचा हा हेतू खरा होता तर तुम्ही स्वतः या प्रकरणात पुढाकार घेतला पाहिजे. सध्याचा दुष्ट बादशहा ह्याला विश्वास आहे की आपण हिंदू नामर्द झालो आहोत व आपण आपल्या धर्माबद्दल सर्व आदर गमावला आहे . बादशहा यांची अशी वृत्ती आपण सहन करू शकत नाही.आपल्या सैनिकांच्या ( क्षत्रियांच्या) व्यक्तिरेखेला अपमानास्पद असे आपण काही सहन करू शकत नाही. वेद संहितांमध्ये धर्माच्या काही आज्ञा पाळल्या जातात, ज्या आपण आपल्या पायाखाली तूडवू शकत नाही किंवा आपण आपले कर्तव्य दुर्लक्ष करू शकत नाही राजा म्हणून आपल्या प्रजेसाठी. या सैतानी बादशहा विरुद्ध आम्ही युद्ध करण्यासाठी तयार आहोत आम्ही आमचं सर्वस्व , आमची संपत्ती, आमची जमीन, आमचा किल्ला त्याग करायला तयार आहोत. आम्ही बादशहाच्या बऱ्याच शूर अधिकाऱ्यांना मारले आहे, अनेकांना तुरुंगात डांबले आहे, काहींकडून खंडणी मागून सोडून दिले, काहींना करूणा दाखवून सोडून दिले आणि काही पळून गेले शिपायांना लाच देऊन. शाही सेनापतींनी अशाप्रकारे स्वतःला अक्षम दाखवले हे सिद्ध झाले.

आता ही वेळ आलेली आहे की आपण बादशहाला स्वतः पकडले पाहिजे आणि कैदेत ठेवले पाहिजे. आणि परिणामे आपण आपली मंदिरे पुन्हा प्रस्थापित करू आणि आपल्या धार्मिक प्रथा पुना कार्यान्वित करू . आम्ही असे ठामपणे सांगतो की नजीकच्या भविष्यात आम्ही हे सर्व अमलात आणण्याचा दृढ संकल्प केला आहे.

पण आपल्या तुलनेने आम्ही तरुण आणि अननुभवी आहोत. आपल्या शौर्याबद्दल आणि आपल्या धर्माच्या आस्थेबद्दल आम्ही बरेच काही ऐकले आहे. आपल्याकडे सध्या स्थितीत राजाचे सात शास्त्र संपूर्णपणे आहे जेणेकरून आपण आपले जर सामर्थ्य दाखवले आणि सहभाग दिला आमच्याशी तर आपण या बादशहाला पूर्णपणे चित्त करू संपवून टाकू. आपण काहीही साध्य करू शकतो. आम्ही जेवहा या परिस्थितीबद्दल विचार करतो की आम्हालाही आश्चर्य वाटते की आपण स्वतः इतके शांत का आहात आणि धर्माबद्दल का दुर्लक्ष करतात.

आम्ही मोहम्मद अकबरला गुजरातमध्ये पाठवण्याचा विचार करत आहे जेणेकरून जे शक्य असेल ते आपण धैर्याने निर्भयपणे कार्यवाही करायची . इराणचा शहा अब्बास यांनी अकबराला पाठिंबा देण्यात तयारी दाखवली आहे पण या कार्यात आपण मुसलमानांकडून मदत स्वीकारू हे आपल्याला शोभून दिसत नाही आणि ज्याचे श्रेय अब्बासला मिळून जाईल. आपले पूज्य पिताजी जयसिंग यांना औरंगजेबाला दिल्लीची गादी मिळवण्यास मदत करून बहुमान मिळाले नाही का ? आपण याचे उदाहरण अनुसरण करून अकबरला सिंहासन मिळवण्याची मदत करून श्रेय प्राप्त करा. तो जर दिल्लीचा बादशहा झाला इराणच्या मुसलमानांची मदत घेऊन तर त्यांचे वर्चस्व राहील. हे आकस्मित होण्यास अशाप्रकारच्या प्रतिबंध करणे आवश्यक आहे. जर आपण आणि आम्ही एकमेकांची सैन्याचे सहकार्य करून अकबरला गादीवर बसवले तर आपल्याला संधी मिळेल आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आणि आपल्या बाजूने आपण जयसिंग घराण्याचे बहुमान वाढवाल.

माझे मंत्री कविकलश आणि जनार्धन पंडित हे आपल्याकडे विस्तारपणे वेगवेगळे पत्र देतील.

ताजा कलम

मला असे वाटते की याच्यापुढे भाष्य करणे अनावश्यक आहे. अशी प्रेरणादायक वास्तविक जीवनातील घटना आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात कधी समाविष्ट केले होते का याचे आम्हाला विस्मय वाटते . किमान मराठी पुस्तकांपासून सुरुवात व्हायला पाहिजे.

The Dharma Dispatch is now available on Telegram! For original and insightful narratives on Indian Culture and History, subscribe to us on Telegram.