दीवार : सिनेसृष्टीत उत्कृष्ट पाठ्यपुस्तक
नेहरूवादी धर्मनिरपेक्षता व साम्यवादाचा सर्वात वाईट पैलू दाखवणारा: प्रस्तावना
Commentary

दीवार : सिनेसृष्टीत उत्कृष्ट पाठ्यपुस्तक नेहरूवादी धर्मनिरपेक्षता व साम्यवादाचा सर्वात वाईट पैलू दाखवणारा: प्रस्तावना

चला दोन निदर्शक घटनांकडे पाहूया ज्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील सहजगत्या रेखाटलेल्या. दोन्ही एकाच व्यक्ती बद्धल आहे, दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत आणि दोघांच्या संदर्भांची चांगली चौकट उपलब्ध आहे. त्यानंतरच्या सत्तर वर्षांच्या राष्ट्रीय आर्थिक संकटाच्या कितीतरी बाबी समजून घेण्यासाठी.

1. नेहरूंच्या बाजूने, व्यावसायिकांसोबतचे त्यांचे मूलभूत धोरण ,मैत्रीला शत्रु बनवले. टाटा सारखी काही व्यवसायिक घरे होती, ज्यांची युद्धानंतरच्या कर तपासात त्यांची प्रतिष्ठा बरीचशी अबाधित राहिली,परंतु तरीही नेहरूंचा दृष्टीकोन त्याच्या भांडवलशाही मित्राबद्दल कठोर झाला. जेआरडी [टाटा] यांना एक विशेषत: तीव्र शब्दांची देवाणघेवाण आठवली. ‘नेहरू मला म्हणाले,“ नफा शब्दाचा उल्लेख केला की मला घृणा येते. ” मी उत्तर दिले, “जवाहरलाल, मी सार्वजनिक क्षेत्राच्या कार्यात नफा मिळवून देण्याच्या गरजेबद्दल बोलत आह!” जवाहरलाल परत बोलले: “माझ्याशी कधीही नफा या शब्दाबद्दल बोलू नकोस, हा एक गलिच्छ शब्द आहे.” नेहरू आर्थिक बाबींमध्ये अज्ञानी होते आणि त्यांनी व्यवसायात समाजवादी तत्वांवर जोर धरला.. त्यात माझी गणना नव्हती. मी फक्त एक व्यापारी होतो.

2. जेआरडीने… [सांगितले] की भारतात बरीच कामे करण्यासारखे होते… सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात पूर्वीच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या , इंडियन रेअर अर्थस् लिमिटेड (भारतीय दुर्मिळ खनिज संस्था) चे नेतृत्व करण्याची नेहरूंनी केलेली विनंती नाकारताना.

जेआरडी टाटांनी नेहरूंच्या प्रस्तावाला नकार दिला. त्याचेच उदाहरण, नुसता विरोध तर बाजूला ठेवा, नेहरूंच्या असहमती बाबचे असहिष्णुताचे हे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन # ८७३७३७४७३४७३७४. १९५३ मध्ये नेहरूंनी त्या काळात जगातील सर्वात उत्कृष्ट कंपन्यांपैकी एका एअरलाईन्स कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले: टाटा एअरलाइन्स जी जेआरडी टाटाने रक्त, घाम, अश्रू आणि अत्यंत उद्युक्त अलौकिक बुद्धिमत्तांनी उभारली होती. जेआरडी टाटा यांनी आपल्या डायरीत याबद्दल दु:ख व्यक्त केले की “माझ्याच जवळच्या मित्राने माझ्या पाठीवर वार केले!” मूलभूत स्वरुपात नेहरूंचे राष्ट्रीयीकरण केरळमधील पहिल्यांदा झालेल्या गैर-कॉंग्रेस सरकारचा निर्लज्जपणे बर्खास्त केल्यापेक्षा काही वेगळे नव्हते. टाटा एअरलाइन्सच्या राष्ट्रीयीकरणानंतरचे काय झाले याची कथा आपल्या सर्वांना ठाऊक आहे: एअर इंडियाला नोकरशाही, भ्रष्टाचार, लाल फिती, पक्षपातीपणा यासारख्या विस्तृत पसरलेल्या गुत्तेत रुपांतर करण्यास फार काळ लागलेला नाही. ही सत्तर वर्षांची अखंड कहाणी आहे. करदात्याच्या मौल्यवान पैशाच्या लूटीची. दुसऱ्या शब्दांत, जवळजवळ प्रत्येक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या बाबतीत ही एकच कथा वारंवार घडत होती.

पण जेआरडी टाटा यांच्यावरील संकट नेहरूंच्या मृत्यूनंतर संपले नाही. त्यांची मुलगी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात ती परिस्थिती अधिकच वाईट झाली. १९८६च्या इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, जेआरडी टाटा (आता ८२) आपल्या अभिजात सभ्यतेने असे म्हणतात:

[जेआरडी टाटा]: त्यानंतर मी कधीही नेहरूंशी आर्थिक बाबींवर चर्चा करू शकलो नाही.

प्र. आपण प्रयत्न केला?

उत्तर. होय. नंतर त्यांनी आणि श्रीमती गांधी यांनी मला असेच काहीसे नम्रपणे सांगून गप्प बसवले. जेव्हा मी आर्थिक धोरणाचा विषय आणू लागलो, तेव्हा जवाहरलाल वळून खिडकीतून बाहेर बघायचे. श्रीमती गांधींनी काहीतरी वेगळे केले.

प्र. तिने रेखाटले ?

उत्तर. होय, तिने रेखाटले . मला फारशी हरकत नव्हती रेखाटण्याबधद्दलची . तिने लिफाफा उचलणे सुरू केले, लिफाफे उघडले व पत्रे काढायला सुरुवात केली. ती कंटाळली होती, असा सभ्य संकेत होता. [भर जोडलेला]

दुरून आणि उपहासाने म्हटले तर धीरूभाई अंबानींच्या नेत्रदीपक यशात योगदान देण्यात सिंहाचा वाटा म्हणजे भ्रष्टाचाराला चालना देण्याची अंतर्गत क्षमता असलेल्या नेहरूवादी कम्युनिस्ट यंत्रणा शोषून काढून लक्षणीयदृष्ट्या नफा कसा मिळवायचा हे समजून घेण्याची त्यांची उत्सुकता, अभ्यासू आणि मूळ वृत्ति. आपल्याकडे मणीरत्नमच्या 'गुरू’ चित्रपटात याचे एक दुर्लक्षित दृश्य परंतु ललित पूर्ण चित्रित केले आहे. ज्यात पंतप्रधानांच्या आईने केलेल्या उपकारा बद्दल कृतज्ञता म्हणून नोटांनी भरलेली एक सूटकेस त्याने पंतप्रधानांना भेट केली आहे. ते दृश्य १९८० च्या दशकाचा सुरूवात ते मध्य काळाचा होता.

पण जवाहरलाल नेहरूंच्या समाजवादी राज्याने १९७० च्या दशकातच संपूर्ण भयानकतेची शिखरं गाठली होती. याचे बीज १९५५ च्या कॉंग्रेस पक्षाच्या अवदी अधिवेशनात पेरली गेली होती , जिथे ज्यांनी भारताला अक्षरशः कम्युनिस्टांच्या स्वाधीन केले आणि सरकार आणि कॉंग्रेस पक्षात लांगूलचालन आणि घोषणाबाजीं करणाऱ्यांचा आवाज मोठा झाला, ज्यांचा कधीच कल नव्हता. एका दिवसाचे प्रामाणिक श्रम करण्याचा. अवदी सत्राचे वर्णन करायला भूतपूर्व कम्युनिस्ट कार्यकर्ता यापेक्षा कोण चांगला असू शकेल ? १९६३ मध्ये लिहिलेले माजी ब्रिटीश कॉमइन्टर्न एजंट फिलिप स्प्रॅट यांचे निरीक्षण आहे [ii] ते म्हणजे

नेहरूंचे कम्युनिझम कम्युनिस्ट पक्षाला विलक्षण उदारपणे वागवणे हे प्रकट झाले. जगातील कोणताही शासक या प्रकारची गोष्ट सहन करत नाही. नेहरू का करतात ? दहा वर्षांपूर्वी (१९५३) कॉंग्रेस पक्ष कोणत्याही प्रकारे समाजवादी नव्हता. जेव्हा अवदी येथे समाजवादी पॅटनवरील ठराव मंजूर झाला तेव्हा एका महत्त्वाच्या कॉंग्रेस कार्यकर्त्याने त्याची तुलना अकबरच्या दिन ए ईलाहीशी केली. ते म्हणाले की समाजवाद हे नेहरूंचे वैयक्तिक वेड आहे, जेव्हा ते काळातून निघून जातील तेव्हा ते विसरले जाईल. त्या वेळी हा एक चतुर निर्णय वाटला, परंतु समाजवादाकडे आकर्षित आणि सत्तेसाठी आसुसलेले, कारकीर्द सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले .. [नेहरूंच्या निधनानंतर] हे अशासाठी की नेहरूंच्या उत्तरार्धात अशा प्रकारे व्यवस्था केली की कम्युनिस्ट समर्थक नियंत्रण ठेवतील. या प्रश्नावरील विवाद हा भारताच्या भवितव्यासाठी सर्वात महत्वाचा आहे ... हे खरे की भारतावर सत्ता गिळणाऱ्यांच्या सरकारची सत्ता कायम राहील का, जो देशाला इच्छेच्या विरोधात कम्युनिझम कडे ढकलत राहील.

"भुकेलेला कारकीर्दकार" याबद्दल त्याच्या स्पष्टीकरणात स्प्रॅट किती अचूक होता हे दर्शविण्यासाठी एक लहान उदाहरण पुरेसे आहे. मोहन कुमारमंगलम जे एक कट्टर कम्युनिस्ट होते ,यांचे इंदिरा गांधींच्या बहुमोल लांगूलचालन करणाऱ्यांमध्ये रूपांतर झाले.

तरीही, ही कथा आता विख्यात झाली आहे की ती योग्य रीतीने मांडू जाऊ शकते. १९७० च्या दशकापर्यंत नेहरूवादी कम्युनिझमने भारतीय अर्थव्यवस्थेचे कायमस्वरूपी टंचाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, जमाखोरी, लुटपाट, आणि अगदी स्पष्टपणे एकाच वेळी भरभराटीच्या काळ्या अर्थव्यवस्थेचे पोषण केले होते.

नेहरूवादी भयानक स्वप्नातील दुसरे महान स्तंभः आहे धर्मनिरपेक्षता, इस्लामवाद साजरा करण्याची आणि हिन्दूंना वाईट ठरवण्याचे अश्लील खेळी राजकीय आवृत्ती आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्या राष्ट्रीय मानस विवेकावर लादलेल्या प्रचंड घोटाळ्याची जाणीव होण्यासाठी १९६० च्या दशकाच्या सुरूवातीपासून ते १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात लिहिलेली मते, संपादकीय, स्तंभ, शैक्षणिक कागदपत्रे आणि पुस्तके यांचे अभिलेख केवळ वाचले पाहिजेत. आणि यात कला, संस्कृती इत्यादी क्षेत्रांमध्ये त्याच प्रचंड घोटाळ्यामुळे झालेल्या स्वत:वरच्या फसवणूकीचा समावेश नाही, जेणेकरून नुकसान अधिकच टिकून राहिल आणि ते कायम टिकेल. हा खरोखर एक चमत्कार आहे की सनातन सभ्यता या प्रचंड पातळीवरच्या हल्ल्याला टिकून राहू शकली आहे ,जरी रक्तबंबाळ झाली तरी.

राजकीय व्यवस्थेने वरून लादलेल्या स्वत:चीच सेवा अशा अस्वस्थतेचा तार्किक परिणाम व्यापक आणि वारंवार सामाजिक अशांतता पसरवत होता. आणि यामुळे सिनेमाच्या विलासी बहरासाठी सुपीक माती प्रदान केली गेली ज्याने खरोखरच समान विचारसरणीचा उत्सव साजरा केला ज्यामुळे ही अराजकता पहिल्यांदा झाली.

१९७५ मधील“ पंथ क्लासिक ”,दीवार (भींत) या वैचारिकसरणीचे सर्वोच्च गौरव आहे. नि:संशय, दीवार हे कलाकृती, कथाकथन, कथा, पटकथा आणि संवाद दृष्टिकोनातून मोजले जाणारे चित्रपट निर्मितीचे एक विलक्षण नमुना आहे. पण, दीवार एक प्रकारे, प्यासाच्या [iii] “जिन्हे नाज है हिंद पर वो कहां है,” मधील नेहरूंच्या समाजवादाविरूद्ध थेट आणि कडवट हल्ला म्हणून सुरू झालेल्या प्रवासामधील, क्रांतिक संधिस्थान म्हणून चिन्हांकित करतो.

पण अत्यंत विचित्रपणे सूक्ष्म पद्धतीने कम्युनिझम आणि नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेचे विषारी मिश्रण दीवार याचे कोणी गंभीरपणे खोलात जाऊन अवलोकन केले नाही. माझ्या मर्यादित वाचनात, अतिसामान्य पुनरावलोकने आणि सिनेमाविषयक समालोचन वगळता चित्रपटाचा तपशीलवार शोध घेणारे एकमेव पुस्तक म्हणजे जहाल कम्युनिस्ट प्राध्यापक, विनय लाल यांचे, दीवार : द फुटपाथ, द सिटी अँड द अ‍ॅग्री यंग मॅन . ज्यात मुख्यतः या चित्रपटाबद्दल भरभरून स्तुती केली आहे.

आणि म्हणूनच, हा निबंध एक गंभीर समालोचनाची सुरुवात आहे की दीवार : सिनेसृष्टीत उत्कृष्ट पाठ्यपुस्तक का आहे नेहरूवादी धर्मनिरपेक्षता आणि कम्युनिझमचा सर्वात वाईट पैलू दाखवण्याबद्दल.

पुढे चालू

संदर्भ

[i] आर.एम. लाला (१९९३). बियॉंड द लास्ट ब्ल्यू माउंटन: ए लाइफ ऑफ जे.आर.डी टाटा, पेंग्विन पीपी ५२१-६. भर जोडलेला.

[ii] सीता राम गोयल (१९९३). जेनीसीस अंड ग्रोथ ऑफ नेहरूइझम: कमिट्मेंट टू कम्युनिझम, व्हॉईस ऑफ इंडिया. फिलिप स्प्राट यांचे प्रस्तावना. भर जोडलेला.

[iii] भाषांतर : भारताचा अभिमान बाळगणारे हे महान नेते कोठे आहेत? साहिर लुधियानवी यांचे गीत.

The Dharma Dispatch is now available on Telegram! For original and insightful narratives on Indian Culture and History, subscribe to us on Telegram.

The Dharma Dispatch
www.dharmadispatch.in